महिला सक्षमीकरणासाठी एमजी मोटरचा उपक्रम


‘ड्राइव्ह हर बॅक’ प्रोग्रामची दुसरी आवृत्ती केली लाँच


मुंबई : लिंगसमानता आणि महिला सक्षमीकरणासाठी एमजी मोटर इंडिया वचनबद्ध आहे. याच तत्त्वाची अंमलबजावणी करण्याकरिता कंपनीने ‘ड्राइव्ह हर बॅक’ उपक्रमाची दुसरी आवृत्ती लाँच केली आहे. या रिटर्नी-शिप प्रोग्राममध्ये मार्केटिंग, कम्युनिकेशन्स, विक्री, विक्रीनंतरचे क्षेत्र आणि उत्पादन प्रक्रिया क्षेत्रातील ३२ महिलांना एक वर्षाची इंटर्नशिप दिली जाईल.


२०१९ मध्ये लाँच झालेला ‘ड्राइव्ह हर बॅक’ हा आगळा-वेगळा उपक्रम अनुभवी आणि शिक्षित महिलांना प्रतिष्ठा आणि आत्मसन्मानासह त्यांचे करिअर सुरू करण्यासाठी सक्षम करतो. निवड झालेल्या महिलांना वैयक्तिक मार्गदर्शन दिल जाते. तसेच कॉर्पोरेट वातावरणात सामावून घेण्यासाठी अंतर्गत मार्गदर्शनही दिले जाते. एमजी सर्व उमेदवारांना नेटवर्कमध्ये संधी आणि व्यावसायिक विकासाची सुविधा प्रदान करते.


एमजी मोटर इंडिया चे एचआर डायरेक्टर यशविंदर पटीयाल म्हणाले, “एमजी मोटर इंडिया हा समाजाप्रती वचनबद्ध असून समाजातील प्रमुख आव्हानांना समोर ठेवून वैविध्यपूर्ण उपक्रम राबवतो. त्यापैकी एमजीची वर्कफोर्स वूमन या खऱ्या अर्थाने चेंजमेकर्स ठरल्या असून त्या अनेक विभागांमध्ये अग्रस्थानी दिसून येतात. वाहन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लैंगिक असमानतेचे प्रमाण दिसून येत असले तरीही ५०:५० असे गुणोत्तर गाठण्याचा आमचा सतत प्रयत्न असतो.”


कंपनीच्या (mgmotor.co.in) वेबसाइटवर या उपक्रमासाठीच्या प्रवेशिका स्वीकारल्या जातील. उमेदवारांच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल आणि त्यातून निवड झाल्यानंतर त्यांना एमजी मोटर इंडियामध्ये कायमस्वरुपी काम दिले जाईल.


Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image