केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्यपालांना पत्र लिहून उत्तर


मुंबई (वृत्तसंस्था) : जनतेच्या भावना आणि श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणं हे आमच्या सरकारचं प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच कोरोनाशी लढताना जसा एकदम लॅाकडाऊन करणं चुकीचं होतं, तसाच तो एकदम उठवणंही अयोग्यच आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यातली प्रार्थनास्थळं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठवलेल्या पत्राला, मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून उत्तर दिलं आहे.  कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणं अंगवळणी पडण्यासाठी, राज्यात सध्या, ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जात असून, असा प्रयत्न करणारं महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिलं राज्य असावं, याकडे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात राज्यपालांचं लक्ष वेधलं आहे.

केवळ धर्मस्थळं उघडणं म्हणजे हिंदुत्व असं आपल्याला वाटत नसल्याचं, त्यांनी स्पष्ट केलं आहे. अशुभाचे संकेत, दैवी साक्षात्कार  असं काही नसून  इतर राज्यांत, देशात बरं-वाईट काय घडतय ते पाहून आपल्या राज्यात चांगलं ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचं  मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image