अरबी समुद्राच्या मध्य पुर्व आणि ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र अजूनही कायम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :  भारतीय हवामान विभागाच्या (IMD) वादळ पुर्वानुमान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण गुजराथच्या किनारपट्टीजवळ पश्चिमेकडे वायव्य दिशेला सरकले आहे. आणि ते समुद्राच्या पूर्वमध्य आणि ईशान्य भागात आज, 17 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी 5.30 पर्यंत प्रभावी राहील. ते पुढे वायव्य पश्चिम भागात सरकेल आणि पुढील 12 तासात ते अरबी समुद्राच्या  मध्य पूर्व तसेच ईशान्य भागात प्रभावी होईल अशी दाट शक्यता आहे.


जोरदार वाऱ्यांचा इशारा


अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहतील, त्यांचा वेग ताशी 60 किमी पर्यंत पोहोचेल. येत्या 24 तासात दक्षिण गुजराथ आणि उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी 25-35 किमी वेगाने वारे वाहतील त्यांचा वेग 45 किमी पर्यंत वाढू शकेल.


समुद्राची स्थिती


अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात 17 ऑक्टोबर रोजी तर मध्य आणि वायव्य भागात 18 ऑक्टोबर रोजी समुद्र खवळलेला ते अति खवळलेला असेल.


दक्षिण गुजराथ आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर 17 ऑक्टोबर रोजी मोठ्या लाटा धडकतील.


मच्छीमारांना सूचना


अरबी समुद्राच्या पूर्व मध्य व ईशान्य भागात 17 ऑक्टोबर रोजी तर मध्य आणि वायव्य भागात  18 ऑक्टोबर रोजी मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.