श्री स्वामी समर्थ मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


पिपरी : श्री.स्वामी समर्थ सेवा प्रतिष्ठान शिवतेजनगर आणि लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एकूण 163 लोकांनी रक्तदान केले. मोरया ब्लड बँक, आणि पी.एस.आय.ब्लड बँक यांचे सहकार्य घेण्यात आले. यावेळी मावळ लोकसभेचे खासदार मा.श्री.श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले.


तसेच ज्यांनी रक्तदान केले त्यांना सर्टिफिकेट, मास्क, सॅनिटायजर, आर्सेनिक अलबम 30, वाफ घेण्याचे यंत्र देण्यात आले. याप्रसंगी श्री.गजानन चिंचवडे (शिवसेना जिल्हा प्रमुख), श्री.नारायण बहिरवाडे (मा.नगरसेवक), सौ.योगिताताई नागरगोजे (विद्यमान नगरसेविका), श्री.भीमसेन अग्रवाल (अध्यक्ष लायन्स क्लब), श्री.विकास गर्ग (अध्यक्ष पूर्णानगर विकास समिती), श्री.हरिनारायण शेळके, सौ.अर्चनाताई तौडकर, श्री.संतोष शेळके, श्री.मंगेश पाटील, सौ.अंजली देव, सौ.सारिका रिकामे, सौ.नीलिमा भंगाळे, सौ.अक्षदा देशपांडे, सौ.प्रीती झोपे, सौ.छाया सातपुते, मेघराज बागी, अशोक बंसल, नितीन गर्ग, नितीन जैन, रवींद्र सातपुते, अशोक अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, समीर मुल्ला, विनोद रोकडे, संभाजी बालघरे श्रीकृष्ण काशीद हे उपस्थित होते. सूत्रसंचालन सुप्रसिद्व निवेदक श्री राजाराम सावंत यांनी केले.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image