‘एमजी ग्लॉस्टर’ २८.९८ लाख रुपयांच्या प्रारंभिक किंमतीत लॉन्च


भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयूव्ही


मुंबई : एमजी मोटर इंडियाने भारतातील पहिली ऑटोनॉमस (लेव्हल-१) प्रीमियम एसयूव्ही एमजी ग्लॉस्टर  २८.९८ लाख रुपयांच्या (एक्स-शोरुम, नवी दिल्ली) प्रारंभिक किंमतीत लाँच केली.


मोहक डिझाइन आणि आकर्षक वैशिष्ट्यांसह २५ लाखांपासून ५० लाख रुपयांपर्यंतच्या रेंजमध्ये ग्लॉस्टर ही प्रीमियम व लक्झरी ही त्याच्या मोहक फीचर्सद्वारे आकर्षक ठरते. भारतात ती सुपर, स्मार्ट, शार्प आणि सॅव्ही या ४ फीचर-इंटेन्सिव्ह प्रकारात उपलब्ध आहे. एमजी कंपनी ग्राहकांना लक्झरीयस बकेट सिट (६ सीटर आणि ७-सीटर ), टू-व्हील ड्राइव्ह, आणि फोर-व्हील ड्राइव्ह अशा विविध कॉम्बिनेशनमध्ये निवडीसाठी दोन इंजिन निवडींचे पर्याय देते. यात ट्विन टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिनचाही समावेश आहे.


ऑटोनॉमिस लेव्हल१ फीचर्स ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स’सह इंडस्ट्री-फर्स्ट कॅप्टन सीट असलेल्या सॅव्ही ट्रिमची किंमत ३५.३८ लाख रुपये असून यात लक्झरी व तंत्रज्ञानाचे परिपूर्ण मिश्रण त्यात आहे. यात इतर सुविधांसह फॉरवर्ड कोलायजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, लेन डिपार्चर वॉर्निंग, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट आणि अडॉप्टिव्ह क्रूस कंट्रोलचा समावेश आहे.


एमजी मोटरने नुकताच भारतातील पहिला वैयक्तिकृत कार ओनरशिप प्रोग्राम ‘माय एमजी शिल्ड’ आणला असून ग्लॉस्टरच्या खरेदीनंतर यात २००पेक्षा जास्त पर्याय असलेल्या विक्रीनंतरच्या सुविधांचा समावेश आहे. ग्लॉस्टर ही 3+3+3 पॅकेजसह येत असून त्यात दर १००,००० किलोमीटरमागे ३ वर्षांची वॉरंटी, तीन वर्षांचे रोडसाइड असिस्टंन्स आणि तीन लेबर-फ्री नियमित सर्व्हिस मिळतात.


एमजी मोटर इंडिया चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राजीव छाबा म्हणाले, ‘ या सेगमेंटमध्ये अनुलनीय लक्झरी, टेक्नोलॉजी आणि ऑफरोडिंग अनुभव देत ग्लॉस्टर ही नवा बेंचमार्क प्रस्थापित करेल, असा आम्हाला विश्वास आहे. वैयक्तिकृत माय एमजी शिल्ड या विक्रीनंतरच्या पॅकेजद्वारे ग्राहकांना आणखी पर्याय उपलब्ध होतील व याद्वारे मानसिक शांततेची सुनिश्चिती होईल. ग्राहकांच्या अपेक्षांपेक्षाही जास्त समाधान करण्याच्या आमच्या तत्त्वानुसार या सुविधा देण्यात आल्या आहेत.”


ग्लॉस्टर आयस्मार्ट २.० ही स्मार्ट, सॅव्ही आणि शार्प अशा ७० प्रकारच्या कनेक्टेड कार फीचर्ससह येते. यात ६४ रंगांची अँबियंट लायटिंग, पॅनोरमिक सनरुफ, ड्रायव्हर्स सीट मेसेंजर आणि १२ प्रकारच्या इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबर ड्रायव्हर सिट अशा सुविधा आहेत.


सर्व ४ प्रीमियम एसयूव्ही आता सामान्य १००,००० रुपयांच्या बुकिंग किंमतीत, एमजी च्या २०० पेक्षा जास्त एक्सपेंसिव्ह नेटवर्क सेंटर्सवर, तिच्या (www.mgmotor.co.in) वेबसाइटवर किंवा एमजी मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.


 
MG GLOSTER – EX SHOWROOM NEW DELHI INTRODUCTORY PRICES (INR) Super (7 str)Smart (6 str)Sharp (7 str)Sharp (6 str)Savvy (6 str)2.0 Diesel Turbo 2WD 8AT28,98,00030,98,000   2.0 Diesel Twin Turbo 4WD 8AT  33,68,00033,98,00035,38,000Prices include INR 50,000 worth customization under My MG ShieldPopular posts
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर 40 हून अधिक लसांवर काम चालू असून, अद्याप कोणीही पुढील टप्प्यात पोहोचलेले नाही : आयसीएमआर
Image
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
ब्रिटनहून येणाऱ्या- जाणाऱ्या विमान वाहतुकीवर ७ जानेवारीपर्यंत निर्बंध
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image