महापारेषण कंपनीनं उत्पन्नाचे अभिनव स्रोत शोधण्यासह यंत्रणेतल्या त्रुटी सुधारण्यासाठी आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा - डॉ. नितीन राऊत


मुंबई (वृत्तसंस्था) : महापारेषण कंपनीनं उत्पन्नाचे अभिनव स्रोत शोधण्यासह यंत्रणेतल्या त्रुटी सुधारण्यासाठी आधुनिकीकरण आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.


तसंच वीज वाहिन्यांवरुन ऑप्टिकल फायबर केबल टाकून त्याद्वारे अंतर्गत संदेशवहन व्यवस्था प्रभावी करण्याबरोबरच उत्पन्नवाढीसाठी त्याचा व्यवसायिक वापर करण्यासाठीचं प्रारूप तयार करावं, अशा सूचना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

तसंच दळणवळण क्षेत्रासाठी ही व्यवस्था मोठी फायदेशीर ठरुन ग्राहकांना जलद इंटरनेट सेवेचा फायदा मिळू शकेल, असंही राऊत यांनी सांगितलं.