लोकल गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढणं महत्त्वाचं, पश्चिम रेल्वेच राज्य सरकारला उत्तर


मुंबई (वृत्तसंस्था) : सर सकट लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वेला पाठवलेल्या पत्राला पश्चिम रेल्वेनं आज उत्तर दिलं आहे.

उपनगरीय लोकल सुरु झाल्यावर गर्दीचं नियोजन कसं करणार, शिवाय लोकल गर्दी नियोजन संदर्भात तांत्रिक दृष्ट्या मार्ग काढणं महत्त्वाचं आहे.

प्रत्येक तासाला महिला विशेष गाडी चालवणं सध्यातरी शक्य नाही, तसंच लोकल सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाची लवकरात लवकर बैठक होणं गरजेचं आहे, असं रेल्वनं आपल्या उत्तरात म्हटलं आहे.