रेझ २०२० परिषदेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय तसेच नीती आयोगाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रेझ २०२० या कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील परिषदेचे उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ही महापरिषद होणार आहे.

आजपासून ९ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत महामारीच्या सज्जतेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, नवोन्मेषामुळे डिजिटायझेशनला चालना, समावेशक कृत्रिम बुद्धिमत्ता आणि यशस्वी नवोन्मेषासाठी भागीदारी आदी विषयांवर सांगोपांग चर्चा होणार आहे.

सरकारच्या 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेच्या अनुषंगाने समावेशक विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कशा पद्धतीने करता येऊ शकेल यावर विचार मंथन होणार आहे.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
मेगापॉलिस मेटाव्हर्सच्या मदतीने मुंबईच्या विकासाला अधिक गती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image