नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात गेले काही दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं तातडीनं मदत द्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी आज पुणे जिल्ह्यातल्या कुरकुंभ, दौड, इंदापूर या परिसरातल्या नुकसानीची पाहणी केली, त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.


जिल्ह्यातले वाहुन गेलेले पुल तातडीनं बांधून, गावागावांचा तुटलेला संपर्क तत्काळ पुर्ववत करावा अशी मागणीही त्यांनी केली.


दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री घरातून काम करत असल्याबद्दल स्पष्टीकरण दिलं होतं. त्याबद्दल वार्ताहरांनी प्रश्न विचारला असता, शरद पवार हे केवळ अपयशी ठरलेल्या राज्य सरकारचा बचाव करायचं काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.