प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी- प्रकाश जावडेकरनवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रसिद्धी माध्यमांनी स्वतःच्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हवी, असं मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. माणिकचंद्र वाजपेयी तथा मामाजी यांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभात आज ते बोलत होते.


यावेळी त्यांनी मामाजींच्या आठवणी जाग्या केल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाहून घेतलेल्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांच्या स्मृतीला उजाळा दिला. प्रसिद्धी माध्यमांच्या स्वातंत्र्यावर सरकारचा विश्वास आहे, मात्र त्यांनी टीआरपीच्या मागे लागून सवंग बातम्या देणं टाळावं, असंही जावडेकर म्हणाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.