टाळेबंदी काळात राज्यात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल


मुंबई (वृत्तसंस्था) : टाळेबंदी सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कलम १८८ नुसार २ लाख ८८ हजार ७३८ गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच ४१ हजार ८२९ व्यक्तींना अटक करण्यात आली असून, ३४ कोटी ९४ लाख ३८ हजार ४५८ रुपये दंड आकारण्यात आला आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

या दरम्यान राज्यात पोलिसांवर हल्ला होण्याच्या ३७९ घटना झाल्या घडल्या आहेत. अवैध वाहतूक करणाऱ्या १ हजार ३४७ वाहनांवर गुन्हे दाखल केले आहेत, तर  ९६ हजार ६०५ वाहने जप्त केली आहेत.