मिठी नदी विकास प्रकल्पासह विविध कामांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा


सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करण्याचे निर्देश


मुंबई : मिठी नदी विकास प्रकल्प, माहिम कॉजवे जोड रस्ता, सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग जोडरस्ता यांसह इतर विविध विकासकामांसंदर्भात आज मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एमएमआरडीए, मुंबई महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करुन आढावा घेतला.


एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीस एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव, अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू, संजीव जयस्वाल, मुंबई शहर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


मिठी नदीचे पुनरुज्जीवन करणे तसेच नदीचा शाश्वत विकास करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. नदीच्या सभोवताली वॉकवे तयार करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याची सुसाध्यता (feasibility) बघून माहिती सादर करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी दिल्या. याबरोबरच सेनापती बापट रोड ते पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यानच्या लिंकरोडच्या कामासंदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. माहिम कॉजवे जोड रस्त्याच्या कामाचाही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. शहरातील कांदळवनांचे चांगल्या पद्धतीने जतन – संवर्धन व्हावे यासाठी त्यांचे वन विभागाला हस्तांतरण करण्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ‘एमएमआरडीए’मार्फत राबविण्यात येत असलेल्या इतर प्रकल्पांचीही यावेळी माहिती घेण्यात आली. लवकरच पुन्हा बैठक घेऊन सर्व कामांना गती देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. एमएमआरडीए, महापालिका आदी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करुन प्रलंबित कामे गतिमान करावीत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image