मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून चार आठवड्यासाठी स्थगित


मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षणासंदर्भातली सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयानं चार आठवड्यांसाठी स्थगित केली आहे. या प्रकरणात राज्याचे वकील मुकुल रोहतगी उपस्थित राहु शकले नाहीत, त्यामुळे न्यायालयानं सुनावणी काही काळासाठी तहकुब केली होती. 


त्यानंतर या प्रकरणी जर सरकारला घटनापीठापुढे जायचं असेल तर त्यासाठी चार आठवड्यांची मूदत देत आजची सुणावणी स्थगित केली. मागच्या सुनावणीच्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाच्या अंबलबजावणीला स्थगिती दिली होती. त्यानंतर ही या प्रकरणासंदर्भातली पहिलीच सुनावणी होती. 


दरम्यान मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर व्हावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपिठानं यापूर्वीच दिला आहे.

त्यामुळे या खंडपीठाचा अंतरिम आदेश निरस्त करायच्या अर्जावरची सुनावणी घटनापीठापुढेच झाली पाहिजे, अशी सरकारची भूमिका असल्याचं, मराठा आरक्षणविषयक मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काल म्हटलं होतं. तशी विनंतीही न्यायालयाला करणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं होतं.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी ‘स्वीप’ उपक्रमांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
Image