दुर्गापुजेनिमीत्त राष्ट्रपती,उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या देशवासीयांना दुर्गापुजेच्या शुभेच्छा


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय संस्कृतीत महिलांना विशेष आदर आहे.अष्टमी आणि दुर्गा पूजेत त्याचं प्रतिबिंब उमटतं,अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दुर्गादेवीचे आशिर्वाद सर्व भारतीयांवर राहो,असं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे. दुर्गादेवीनं सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, निरोगी आयुष्य आणि भरभराट आणावी,अशा शुभेच्छा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.