महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा विटंबनेचा जाहीर निषेध
पिंपरी : बीड जिल्ह्यातील बर्दापूर याठिकाणी दिनांक २८ऑक्टोबर २०२० रोजी पहाटे अज्ञात समाजकंटकांनी महामानव विश्‍वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास दगडफेक करत मोडतोड करून विटंबना केली होती.


सदर प्रकरणी तीव्र निषेधाचे पत्र मा पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड मा कृष्णप्रकाश यांना लढा यूथ मूव्हमेंट कडून देण्यात आले.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या विटंबनांचे प्रकार सर्रास निदर्शनास येत आहेत. अशा प्रकारचे कृत्य करून आंबेडकरि समाजाला टार्गेट करत भावना दुखावण्याचा प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. अशा समाज कंठकांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. अन्यथा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन परिस्थिती हाताबाहेर जाईल. सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी प्रशासनाने तात्काळ सदर प्रकारातील आरोपींना अटक करावे. तात्काळ अटक न केल्यास तीव्र निषेध आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या पत्रामार्फत देण्यात आला आहे.


सदरील निषेध पात्रावर लढा यूथ मूव्हमेंट प्रमुख प्रमोद क्षिरसागर, भैय्यासाहेब ठोकळ, अमित गोरे, राष्ट्रतेज सवई, बुद्धभूषण अहिरे, सिद्धार्थ मोरे,समाधान कांबळे, संदीप माने,आप्पा कांबळे,राकेश माने,गौतम कांबळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.