केंद्र सरकारची पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं पब-जी सह ११८ मोबाईल अँपवर बंदी घातली आहे. यामुळे देशातल्या कोट्यवधी मोबाईल आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हिताचं रक्षण होईल, असं सरकारनं म्हटलं आहे. पब-जीसह वी-चॅट वर्क, सायबर हंटर, लाईफ-आफ्टर, लिव्हिक अशा अँपचा यात समावेश आहे.

या अँप्स संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे तसंच या अँपद्वारे वापरकर्त्यांची माहिती देशाबाहेर पाठवली जात असल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.