कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बिबवेवाडी राज्य बीमा निगम रुग्णालय अधिग्रहित-जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख


पुणे : कर्मचारी राज्य बीमा निगम अस्पताल (इएसआयसी), बिबवेवाडी पुणे या ठिकाणचे कोविड केअर सेंटर (सीसीसी) स्थापन केलेले आहे. कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) मध्ये रुपांतर करण्याकरीता हे रुग्णालय सर्व मनुष्यबळ व सुविधांसह कोविड-19 चे कालावधीपुरते अधिग्रहण करून जिल्हा परिषद पुणे यांचेकडे वर्ग करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.


आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे व त्यातील पोट कलम 2 (अ) नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हे उक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागु करुन खंड 2, 3,4 मधील तरतुदीची अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केलेली आहे.


कोविड -19 च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या रुग्णालयाचे समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) मध्ये रुपांतर करण्याकरीता कर्मचारी राज्य बीमा निगम अस्पताल (इसीआयसी), बिबवेवाडी पुणे या ठिकाणचे कोविड केअर सेंटर (सीसीसी) रुग्णालय सर्व मनुष्यबळ व सुविधांसह कोविड-19 चे कालावधीपुरते मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पुणे यांच्याकडे अधिग्रहीत करून वर्ग करण्यात येत आहे.


अटी व शर्ती पुढीलप्रमाणे : रुग्णालय हे श्रम एवं रोजगार मंत्रालय, भारत सरकार संलग्ण केंद्रिय महामंडळाचे नियंत्रणाखाली असलेला बाह्य रुग्ण विभाग तात्पुरत्या स्वरुपात जिल्हा परिषद पुणे यांच्या नियंत्रणाखाली देण्यात येत आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक संभाजी लांगोरे यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये जिल्हा परिषदेमार्फत कोविड केअर सेंटर (सीसीसी) सुरू करण्यात आलेले आहे. हया रुग्णालयातील उपलब्ध 50 बेडस् पैकी 36 बेडस् करीता ऑक्सिजन पाईपलाईन उपलब्ध आहे. उर्वरित बेडस् करीता ऑक्सिजन सुविधा निर्माण करण्याकरीता ऑक्सिजन सिलींडर्सचा पुरवठा उपलब्ध करून घेण्यात यावा. या ठिकाणी समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) सुरू करण्याकरीता ऑक्सिजन सिलींडर्स, व्यतिरिक्त एक्स-रे मशीन, इसीजी मशीन, अॅम्बुलन्स, टेक्नीशीयन, आवश्यक ते प्रमाणे डॉक्टर (एमडी आणि एमबीबीएस) इत्यादी सुविधा साथरोग संपल्यानंतर माघारी घेण्याच्या अधिन राहून एनएचएम मधून उपलब्ध करून देण्यात याव्यात. या डीसीएचसी मध्ये अनुभवी वैद्यकिय अधिक्षक/वैद्यकिय अधिकारी यांच्या नेमणूका करून कामकाज सुरळीत करावे.


या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी आदेशीत केले आहे.