देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात गेल्या चोवीस तासांत ७० हजार ८८० रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या देशभरातली एकूण रुग्णांची संख्या ३५ लाख ५० हजार झाली आहे. याबरोबरच देशातला कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर वाढून ७७ पूर्णांक ६५ शतांश टक्के झाला आहे.

याच काळात देशभरात ९६ हजार ५५१ कोरोनाबाधित रुग्णांचीही नोंद झाली. सध्या देशभरातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ झाली आहे. देशभरात काल १ हजार २०९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानं, मृतांची एकूण संख्या ७६ हजार २७१ झाली आहे.

सध्या देशातला मृत्यूदर १ पुर्णांक ६७ दशांश टक्के इतका खाली आला आहे. सध्या देशभरात ९ लाख ४३ हजार ४८० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.