कोविड-१९ वरील लस पुढील वर्षीच्या सुरुवातीला उपलब्ध होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात तीन लसींच्या चाचण्या सुरु आहेत. पुढील वर्षीच्या सुरुवातीपर्यंत ही लस उपलब्ध होण्याची आशा आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सभेत एका लेखी   प्रश्नाच्या उत्तराला दिली.


तो पर्यंत लोकांनी कोरोना विषयक सुचनांचं पालन करावं, असं आावहन त्यांनी केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला बऱ्याच प्रमाणात यश आलं आहे, असंही ते म्हणाले.


भारत, जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य आंतरराष्ट्रीय संघटनांबरोबर मिळून लस निर्मितीसाठी प्रयत्न करत आहे, कोरोना विरुद्धचा लढा आणि पूढील आव्हानांसाठी राज्य आणि केंद्रानं एकत्र येऊन काम करायला हवं, असं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या विषयावरील चर्चेत सहभागी होताना म्हटलं. त्यांनी या विषयी राज्याच्या कामगिरी बाबत माहिती दिली.