डॉलरचे मूल्य खालावल्याने बेस मेटलच्या दरात घसरण; सोन्याला आधार


मुंबई : अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्याने सुरक्षित मालमत्ता असलेल्या सोन्याला आगामी सत्रात मागणी मिळेल. तथापि, अधिक मदतपर उपाययोजनांच्या अपेक्षांअभावी सोन्याचे दर खालावले. तसेच अमेरिकेच्या डॉलरमध्ये घट झाल्याने इतर चलनधारकांसाठी औद्योगिक धातूंचे दर कमी झाले. ओपेककडून आदेशांचे कठोर पालन होत असल्याने तसेच अमेरिकी क्रूडच्या साठ्यात घट झाल्याने कच्च्या तेलाचे दर वाढले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


सोने: अमेरिकी फेडरल रिझर्व्हने आणखी मदतीच्या उपयायोजनांच्या अपेक्षा फेटाळून लावल्या. त्यामुळे स्पॉट गोल्डचे दर ०.८५% नी घटले व १९४२.६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. आर्थिक आकडेवारी समाधानकारक नसली तरी अमेरिकेला पुढील काही महिन्यात वेगाने आर्थिक सुधारणांची अपेक्षा आहे. अमेरिकेतील बेरोजगारीच्या दाव्यांत घट झाल्याने अमेरिकी फेडरलने आर्थिक सुधारणेची गती वाढण्याची अपेक्षा केली. त्यामुळे गुंतवणुकदारांची जोखीम घेण्याची भूकही वाढली.


अमेरिकी फेडरलने कमी व्याजदराची स्थिती कायम ठेवले असून कोव्हिड-१९ मुळे उद्भवलेल्या मंदीला आधार देण्यासाटी आणखी मदतीच्या उपाययोजनांचे संकेत दिसत नाहीत. त्यामुळे पिवळ्या धातूचे दर आणखी घसरले.


कच्चे तेल: ओपेकने उत्पादनातील नियमांची कठोर अंमलबजावणी केल्यामुळे गुरुवारी डब्ल्यूटीआय क्रूड तेलाचे दर २ टक्क्यांनी वाढले व ते ४१ डॉलर प्रति बॅरलवर स्थिरावले. तसेच अमेरिकेच्या तेलसाठ्यात घट झाल्यानेही कच्च्या तेलाच्या दरवाढीत आणखी भर पडली.


ओपेक आणि सदस्यांनी म्हटले की, लागू केलेल्या उत्पादन कपातीचे नियम न पाळणाऱ्या देशांना पुढील काही महिन्यांत नुकसान भरपाई म्हणून अतिरिक्त उत्पादन कपात सहन करावी लागेल. ऑक्टोबर २०२० मध्ये जागतिक तेलाच्या बाजाराची स्थिती सतत घसरत असल्याने ओपेक+ तर्फे आणखी एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.


एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, रॉयटर्सचा १.३ दशलक्ष बॅरलचा अंदाज असताना अमेरिकी तेलसाठ्यात ४.४ दशलक्ष बॅरलची घट झाली. अनेक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर लिबियाने पुन्हा तेल उत्पादन सुरु केले. यामुळे जागतिक तेल बाजारात दहा लाख बॅरल प्रति दिन एवढी भर पडण्याची शक्यता आहे. वादळानंतर अमेरिकेचे तेल उत्पादनही पुन्हा सुरू झाले. तथापि, कमी झालेल्या मागणीमुळे कदाचित तेलाच्या किंमती आणखी घसरतील. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तेलाचा व्यापार लक्षणीय होण्याची शक्यता आहे.


बेस मेटल्स: अमेरिकी डॉलरच्या मूल्यात घसरण होत असल्याने एलएमईवर बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेतील डॉलर घसरणे हे बेरोजजगारीचे दावे वाढल्याचे संकेत आहेत. त्यामुळे इतर चलनधारकांसाठी धातू स्वस्त झाला. अमेरिका आणि चीनदरम्यान वाढत्या तणावामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमधील गुंतवणुकीत घट झाली. त्यामुळेही औद्योगिक धातूंच्या दरात घसरण दिसून आली.


तथापि, धातूचा जगात सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनकडून बेस मेटलच्या मागणीत वाढ झाल्यानेे कमी नुकसान झाले. ऑगस्ट २०२० मध्ये चीनच्या आर्थिक घडामोडींना वेग आला. यामुळे साथीमुळे उद्भवलेले आर्थिक संकट दूर होण्याची चिन्हे दिसतत आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये चीनमधील औद्योगिक उत्पादनही ५.६ टक्क्यांनी वाढले.


तांबे: एलएमई कॉपरचे दर ०.०५ टक्क्यांनी वाढले व ते ६७८०.५ डॉलर प्रति टनांवर स्थिरावले. नॅशनल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, ऑगस्ट २०२० मध्ये चीनच्या रिफाइन्ड कॉपरचे उत्पादन ८९४,००० टन झाले. तथापि, अमेरिकी डॉलरचे मूल्य वाढल्यास लाल धातूंचे दर घसरू शकतात. एमसीएक्सवर आज तांब्याचा व्यापार चांगला होण्याची शक्यता आहे.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image