माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छानवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्या वाढदिवसानिमित्त प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. डॉ. सिंग यांना दिर्घ आयुरारोग्य लाभो अशी आपण इश्वर चरणी प्रार्थना करत असल्याचं ट्विट मोदी यांनी केलं आहे. काँग्रेस नेते राहूल गांधी यांनीही मनमोहन सिंग यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्यासारख्या प्रधानमंत्र्याची उणी देशाला भासत आहे. त्यांचा प्रामाणिकपणा, शालींता आणि समर्पण वृत्ती आपल्या सर्वांना प्रेरणा देत असल्याचं राहूल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे. काँग्रेसनेही पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सिंग यांना शुभेच्छा दिल्या आहेत. समाजातल्या वाईट गोष्टीचं निमृलन लवकरात लवकर आणि खात्रीदायक मार्गाने करणं हे सिंग यांचं प्राथमिक उद्दिष्ट राहिलं आहे. प्रत्येक भारतीयाच्या सर्वांगिण कल्याणासाठी त्यांची बांधिलकी लक्षणीय आहे, असं काँग्रेसनं म्हटलं आहे.