भारत आणि भूतानलगतच्या सीमेवरील भाग बळकावण्याचा चीनचा प्रयत्न - अमेरिका


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण आणि पूर्व चीन समुद्रात तसंच भारत आणि भूतानलगतच्या सीमेवर आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीन जबरदस्तीनं तो भाग बळकावण्याचा प्रयत्न करत आहे, असं अमेरिकेचं संरक्षण खातं, पेंटॅगॉननं म्हटलं आहे. दक्षिण आणि पूर्व चीन  समुद्रात चीन हेतूपूर्वक प्रदेशिक वाद  उकरून काढत आहे.

तो भाग आपल्या वर्चस्व ठेवण्यासाठी चीननं या समुद्रातल्या आपल्या ताब्यात असलेल्या बेटांवर सैन्याची जमवाजमव केली आहे. हा संपूर्ण प्रदेश खनिजं, तेल आणि इतर नैसर्गिक साधन संपत्तीनं समृद्ध असून जागतिक व्यापाराच्या दृष्टीनंही ते मोक्याचं ठिकाण आहे, असं पेंटॅगॉनच्या चीनच्या लष्करी हालचालींसदर्भातल्या अहवालात म्हटलं आहे.


Popular posts
नाशिक फाटा ते मोशी परिपूर्ण राष्ट्रीय महामार्ग अखेर दृष्टीक्षेपात !
Image
अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नोकरीबाबत मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक संपन्न
Image
महिला आणि मुलींच्या न्याय व हक्कांसाठी गावोगावी जनजागृती, सौहार्दवाढीचे कार्यक्रम राबविण्यात यावेत
Image
दरदिवशी होणाऱ्या कोविड मृत्यूंपैकी 71% मृत्यू हे दिल्ली , महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, हरीयाणा, पंजाब, केरळ, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या आठ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांत, 22 राज्ये/केंद्रशासित प्रदेशात मृत्यू दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी
Image
कॅटरिंग ब्रँड फीस्टलीचा मुंबईत प्रवेश
Image