सोशल मीडियाच्या माध्यामातून फोफावत असलेली गुन्हेगारी रोखा - प्रमोद क्षिरसागर


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विविध संघटनांनी दिनांक 23/09/2020 रोजी सोशल मीडियाचा गैरवापर करत, शहरात दहशत पसरवण्याचे काम करणार्‍या गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी, विविध संघटनांनी पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त मा. कृष्णप्रकाश यांच्याकडे केली आहे.


आपल्या वाईट कृत्यांना सोशल मीडियाद्वारे प्रसिद्ध करत सामान्य नागरिकांवर आपला दबाव कायम राहावा या उद्देशाने फेसबुक, व्हॉट्सअप व इतर सोशल मीडियामाध्यमांचा वापर केला जात आहे. तसेच एका टोळीकडून दुसर्‍या टोळ्यांना इशारे, आव्हाने देण्यासाठी देखील सोशल मीडिया माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सोशल मीडियावर टोळ्यांच्या जाहिराती करून जणू नवयुवकांना आकर्षित करण्याचा चंग इथल्या गुन्हेगार मंडळींनी बांधल्याचे दिसून येत आहे. असे लढा यूथ मूव्हमेंटचे प्रमुख प्रमोद क्षिरसागर यांनी म्हंटले आहे.


फेसबुकच्या माध्यमातून सेक्टर नंबर 22 निगडीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीची बदनामीकारक पोस्ट निदर्शनास आली. सदर घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो. सदरच्या निवेदनाद्वारे, सोशल मीडियाचा गैरवापर करीत शहरात दहशत माजवणार्‍या गुन्हेगार मंडळींवर लक्ष ठेऊन, त्यांचा बंदोबस्त करून त्याच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी. अशा मागणीचे निवेदन पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त मा कृष्णप्रकाश यांच्याकडे सादर केले आहे. सदर निवेदनावर लढा यूथ मूव्हमेंटचे प्रमुख प्रमोद क्षिरसागर, अमित गोरे, मेघाताई आठवले, प्रबुद्ध कांबळे, भैय्यासाहेब ठोकळ, बुद्धभूषण अहिरे, सिद्धार्थ मोरे, समाधान कांबळे, संदीप माने, राष्ट्रतेज सवई, राकेश माने, गौतम कांबळे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.