महामारी सुधारणा विधेयक-२०२० राज्यसभेत मंजूर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज महामारी सुधारणा विधेयक-२०२० मंजूर करण्यात आलं. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामण यांनी हे विधेयक आज राज्यसभेत मांडलं. दिवाळखोरी आणि कर्जबाजारी सुधारणा विधेयक दोन हजार वीसही आज संमत करण्यात आलं.

भाजपाचे सदस्य अरुण सिंग यांनी या विधेयकाचं स्वागत केलं. ए.आय.ए.डी.एम.केचे ऐ. विजयकुमार, डीएमकेचे पी. विल्सन, संयुक्त जनता दलाचे आर. सी. पी. सिंग यांनीही याविषयीच्या चर्चेत सहभाग घेतला.

सैन्यदलातील २२ हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक कोरोनासंक्रमित झाले असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी आज राज्यसभेत दिली. सैनिकांच्या आरोग्यासाठी अनेक सुरक्षात्मक उपाययोजना केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

लष्कराच्या सर्व रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या असल्याचंही नाईक यांनी सांगितलं. संरक्षण तसंच हवाई क्षेत्रात या वर्षाच्या जूनअखेरपर्यंत २ हजार ८८३ कोटी रुपयांच्या थेट परदेशी गुंतवणूक झाली असल्याची माहितीही नाईक यांनी दिली.

एक लेखी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहितीदिली. या वर्षी २५ मार्चनंतरच्या सहा महिन्यांच्या काळात थकलेल्या कर्जासाठी दिवाळखोरीची प्रक्रिया कंपनी अथवा त्यांच्या कर्ज पुरवठादारांनी सुरू करु नये असं या सुधारणेद्वारेसुचवण्यात आलं आहे.

केंद्र सरकार हा कालावधी एक वर्षाचा करण्याचीही शक्यता आहे. कोविड-१९ साथीचा उद्योगधंद्यांवर झालेला परिणाम लक्षात घेऊन या सुधारणेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.