विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण


मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची बाधा झाली असून काल रात्री त्यांचा अहवाल पॉजिटीव्ह आला. त्यामुळे सोमवार पासून सुरू होणाऱ्या अदिवेशनाच्या कामकाजात ते सहभागी होऊ शकणार नाहीत.

त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे अध्यक्षपद भुषवतील. पटोले यांनी त्यांच्य़ा संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोनाची चाचणी करण्याचं आवाहन केलं आहे.

काही दिवसांपुर्वी अधिवेशनाच्या पार्श्वभुमिवर पटोले यांनी आरोग्य सचीव आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठकही बोलावली होती. या सर्वांची देखील आज चाचणी करण्यात आली आहे.