लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चीन आणि भारतात सध्या वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे आजपासून दोन दिवसांच्या लडाख दौऱ्यावर गेले आहेत. तूर्त चीनकडून सीमारेषा बदलण्याच्या आगळीकीसंदर्भात सेनादलाच्या अधिकाऱ्यांकडून ते आढावा घेणार आहेत.

२९ आणि ३० ऑगस्ट रोजी चिनी सैन्यानं लडाखच्या पेनगांग भागात प्रत्यक्ष सीमारेषा बदलण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर भारतानं या भागात बंदोबस्तात वाढ केली आहे.