विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची ख्यातनाम विमानवाहू युद्धनौका ‘विराट’चा अखेरचा प्रवास आज सुरु होणार आहे. तब्बल तीस वर्षांच्या सेवेनंतर गुजरातमधल्या अलंग इथल्या जहाज तोडणी कारखान्यात तिचे सुट्टे भाग केले जातील. २०१७ मधे ही युद्धनौका निवृत्त झाली होती.

त्यानंतर वस्तूसंग्रहालय किंवा अलिशान रेस्त्रॉमधे तिचं रुपांतर करण्याचा प्रस्ताव होता, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अंतिमतः विराट मोडित काढण्याचं ठरलं, त्यात श्रीराम समुहानं लिलावात बाजी मारली. दोन दिवसाचा प्रवास करुन विराट अलंगला पोहोचेल.