सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन


मुंबई : संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता मिळण्याकरिताविहित निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना २५ सप्टेंबर २०२० पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे संचालक यांनी केले आहे.


संचालक, औद्योगिकसुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्यावतीने सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून मान्यता देणेसाठी शासनाने ठरविलेल्या निकषांची पूर्तता करणाऱ्या व्यक्तीकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र व्यक्तींनी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रतिसह दोन संच २५ सप्टेंबर २०२० पर्यंत संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कामगारभवन, ई ब्लॉक, सी – २०, वांद्रे – कुर्ला संकुल, वांद्रे पूर्व, मुंबई ४०० ०५१ इथे सादर करावा. तसेच अधिक माहितीसाठी www.mahadish.in या संकेतस्थळास भेट द्यावी असेही संचालकांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.