पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
• महेश आनंदा लोंढे
पिंपरी : स्वच्छ महाराष्ट्र/ भारतअभियान (नागरी) अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रामध्ये स्वच्छ सर्वेक्षण २०२१ सुरु झालेले आहे. सदर अभियानामध्ये नागरीकांचा व समाजातील सर्व घटकांचा व्यापक स्वरुपात सहभाग असणे तसेच माहिती, शिक्षण व संवादाद्वारे वर्तनामध्ये बदल घडविणे हा या सर्वेक्षणाचा प्रमुख हेतु आहे.
त्या अनुषंगाने स्वच्छ महाराष्ट्र / भारत अभियान अंतर्गत निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्षेत्रामधील नागरीक, एनजीओ, गृहनिर्माण संस्था, असोसिएशन, शाळा व कॉलेज विदयार्थी यांनी घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टीकबंदी मोहिम, कोवीड १९, इ. स्वच्छता विषयक बाबींबाबत निबंध, चित्रकला, घोषवाक्य पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या sbm2020@pcmcindia.gov.in या ईमेल आयडी वर दिनांक ३०/०९/२०२० पर्यंत पाठविण्यात यावी. प्राप्त होणा-या साहित्यामधुन प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकांना प्रशस्तीपत्रक प्रदान करण्यात येईल. तरी शहरातील जास्तीत जास्त नागरीक / संस्था यांनी सहभाग नोंदवुन पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्यास महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.