टाळेबंदीचा कालावधी आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी उपयुक्त - आरोग्य मंत्रालय
• महेश आनंदा लोंढे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे सुमारे १४ ते २९ लाख नागरिकांना विषाणू संसर्गापासून वाचवण्यात आलं; तसंच या काळात कोविडमुळे होणारे ३७ ते ७५ हजार संभाव्य मृत्यू रोखण्यात आले अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं राज्यसभेत दिली आहे.
टाळेबंदीचा हा चार महिन्यांचा कालावधी देशातली आरोग्य यंत्रणा बळकट करणं , आरोग्य क्षेत्रातलं मनुष्यबळ वाढवणं आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणांचं उत्पादन देशातच करण्यासाठी उपयुक्त ठरला असल्याची माहिती; केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.