राज्यात टेलीआयसीयू उभारण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही


मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेच्या माध्यमातून कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून, त्याचा परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला दिसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.

राज्यात सर्वत्र टेलीआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातल्या रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील, याकडे लक्ष देणार असून, राज्यात ठिकठिकाणी जम्बो सुविधा, चाचण्यांची व्यवस्था, प्रयोगशाळा उभारल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.