नवी दिल्ली : मार्च 2020 पासून विविध माध्यमांद्वारे बालकांच्या लैंगिक शोषणासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारींचा अहवाल
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी यंत्रणा (NCRP)यांच्या अहवालानुसार 01.03.2020 ते 18.9.2020मध्ये राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर चाईल्ड पोर्नोग्राफी/ बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या दाखल झालेल्या तक्रारींची एकूण संख्या 13244 एवढी आहे.
राष्ट्रीय बालक हक्क संरक्षण आयोग (NCPCR) यांच्याकडून मिळालेल्या अहवालानुसार 1 मार्च 2020 ते 31 ऑगस्ट 2020 दरम्यान ऑनलाइन पोर्टल, हेल्पलाइन व इतर माध्यमांमधून बालक लैंगिक अत्याचाराच्या 420 तक्रारी आयोगाकडे (NCPCR) आल्या.
चाईल्डलाईन इंडिया फाउंडेशन (CIF) यांच्याकडून आलेल्या अहवालानुसार 1 मार्च 2020 ते 15 सप्टेंबर 2020 दरम्यान लैंगिक शोषणासंदर्भात 3941 एवढे फोन हेल्पलाइनकडे आले.