मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आद्यक्रांतीवीर उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, ब्रिटिशांच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून उठाव घडवून आणण्यात राजे उमाजी नाईक यांचे मोठे योगदान होते. त्यांनी ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ काढून अनेक घटकांना संघटीत करण्याचे प्रयत्न केले. ब्रिटिशांना सळो की पळो करणाऱ्या राजे उमाजींना देहदंडाला सामोरे जावे लागले. अशा या महान आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन.


Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image