प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची बैठक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांची उच्चस्तरिय बैठक होणार आहे.

या राज्यांमधल्या कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत, तसंच राज्यातल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे.

देशातले ६५ पूर्णांक ५ दशांश टक्के कोविड रुग्ण महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, दिल्ली आणि पंजाब या सात राज्यांमधे असून देशातले कोरोनामुळे होणारे ७० टक्के मृत्यू याचं ठिकाणी नोंदवले गेले आहेत.


Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image