अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या अभ्यासाला मान्यता


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनावरील उपचार पद्धतीत अडुळसा आणि गुळवेलच्या वापराच्या दृष्टीनं विशेष अभ्यास करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय आयषु मत्रांलयानं मान्यता दिली आहे. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेत भारतीय वैद्यकीय विज्ञान परिषदेच्या सहाय्यानं हा अभ्यास केला जाणार आहे.

कोरोनाबाधित रुग्णांवर तसंच कोरोनाची लक्षणं असणाऱ्यांवर या औषधांचा काय परिणाम होतो हे प्रामुख्यानं अभ्यासलं जाणार आहे. भारतीय उपचार पद्धतीत अडुळसा आणि गुळवेल यांचा उपयोग अनेक रोगांवर उपचारा साठी केला जातो. या दोन्हींच्या वापरामुळे कोरोना बाधितांवर काय परिणाम होतो, याकडे अभ्यासकांचं लक्ष लागलं आहे.