कंपनी सुधारणा विधेयकाला राज्यसभेत मंजुरी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेनं आज कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली. लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या सुधारणा विधेयकामध्ये काही गुन्ह्यासंदर्भात तुरुंगवास तसंच दंडाची तरतूद शिथिल करण्यात आली आहे.
 
तसंच काही प्रकरणासंबंधित दंडाची रक्कम कमी करण्यात आली आहे. या सुधारणांची दीर्घ काळापासून प्रतीक्षा होती, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं.

देशात शेतक-यांनी संचालित केलेल्या दहा हजार कंपन्या उभारल्या जाव्यात हे सरकाराचं उद्दिष्ट आहे, असंही त्यांनी सांगितलं. बिजू जनता दल, तेलगू देसम, YSR काँग्रेसच्या सदस्यांनी या विधेयकाला पाठिंबा दिला.