एनडीए आणि नौदल अकादमी परीक्षा (II), 2019 चे अंतिम निकाल जाहीर


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने 17 नोव्हेंबर 2019 मध्ये घेतलेल्या परीक्षेत आणि त्यानंतर  संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारावर पात्र 662 उमेदवारांची यादी देण्यात आली आहे.  राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल यासाठीच्या  144 व्या अभ्यासक्रमाच्या, नौदल अकादमीच्या 106 व्या  अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी या मुलाखती घेण्यात आल्या. अभ्यासक्रम सुरु होण्याच्या  तारीखेबाबत  सविस्तर माहितीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या www.joinindianarmy.nic.in  आणि  www.careerindianairforce.cdac.in. या संकेत स्थळाला भेट द्यावी.ही यादी तयार करताना वैद्यकीय परीक्षेचा निकाल लक्षात घेण्यात आलेला नाही.


उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असून, त्यांनी जन्म दाखला, शैक्षणिक पात्रता यासंदर्भात  आवश्यक  प्रमाणपत्रे,अतिरिक्त भर्ती महासंचालनालय, एकीकृत मुख्यालय, संरक्षण मंत्रालय, ( लष्कर )पश्चिम ब्लॉक III, विंग- I, आर के पुरम, नवी दिल्ली -110066 इथे   सादर करण्याच्या अधीन असेल. युपीएससी कडे ही कागदपत्रे सादर करायची नाहीत.


पत्यात बदल असल्यास उमेदवाराने तातडीने वर दिलेल्या पत्यावर  लष्कर मुख्यालयाशी संपर्क साधावा.


यूपीएससीच्या https://www.upsc.gov.in. या संकेत स्थळावरही निकाल उपलब्ध आहे.मात्र गुण अंतिम निकालाच्या 15 दिवसानंतर उपलब्ध होतील.


अधिक माहितीसाठी उमेदवार आयोगाच्या सी प्रवेश द्वाराजवळच्या सुविधा केंद्राशी प्रत्यक्ष किंवा  011-23385271/011-23381125/011-23098543 या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:00 ते संध्याकाळी 5  या वेळेत संपर्क करू शकतात.


निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा


Popular posts
अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले
Image
सफाई कामगारांच्या पाल्यांना वारसा हक्क नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश
Image
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भांडार व शिक्षण विभाग म्हणजे "उंदराला मांजर साक्ष" ; सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांचा आरोप
Image
यूनियन बँकेने आंध्र बँकेच्या सर्व शाखांचे आयटी इंटिग्रेशन केले पूर्ण
Image
राज्यात येत्या ३० एप्रिलपर्यंत असलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
Image