भारत आणि अमेरिकेमध्ये टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिकेमध्ये काल टू प्लस टू ही द्विपक्षीय बैठक झाली. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत दोन देशांमधील संरक्षण, सुरक्षा आणि परराष्ट्र या क्षेत्रांमधील संबंधांचा आढावा घेतला गेला.

प्रादेशिक विकासासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.