जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचं संरक्षण करताना लडाख सीमेवर वीर मरण आलेले जवान सचिन जाधव यांच्या पार्थिवावर आज सातारा जिल्ह्यात दुसाळे या त्यांच्या मुळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

१६ सप्टेंबरला लष्करात सेवा बजावताना त्यांना वीर मरण आलं होतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सचिन जाधव यांच्या शौर्याला वंदन करत, श्रद्धांजली वाहिली आहे.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.