प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे निगडीमध्ये ना.बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते उद्घाटन


पिंपरी : प्रहार जनशक्ती पक्षाच्या पुणे जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन गुरुवार महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय जननेते आणि विद्यमान मंत्री नामदार बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते निगडीमध्ये करण्यात आले. सोशल डिस्टसिंग पाळत पक्षाने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी पुणे जिल्हा कार्यकारिणी आणि अन्य तालुक्यांच्या नियुक्त्यांची औपचारिक घोषणा पक्षाकडून करण्यात आल्याची माहिती पक्षाचे संघटक नीरज कडू यांनी दिली आहे.


यावेळी बोलताना बच्चूभाऊंनी पक्ष आणि कार्यकर्ता हा ज्या ठिकाणी शासन पोहोचत नाही, अशा ठिकाणी पोहोचला पाहिजे. तसेच गरीब, शोषित, अन्यायग्रस्त अशा घटकांसाठी कार्यकर्त्यांनी आपल्या जीवाचे रान करण्याची तयारी ठेवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी नविनियुक्त पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना केले.


प्रहार जनशक्ती पक्षाच्या विस्ताराचा भाग म्हणून पक्षाने आता पश्चिम महाराष्ट्राकडे लक्ष दिले आहे. बच्चूभाऊ यांचे समाजकार्य आणि त्यांची जनमानसात असलेली स्वच्छ प्रतिमा, याचा पक्षाला विस्तारात निश्चितपणे फायदा होईल असा दावा नीरज कडू यांनी केला आहे. तसेच पुढील काळात जनसामान्यांना अडचणीच्या असलेल्या समस्यांना पक्ष वाचा फोडत राहील आणि सर्व प्रकारच्या पुढील काळातील निवडणुका लढविण्याची तयारी पक्ष कार्यकर्त्यांनी ठेवावी असे आवाहन त्यांनी या वेळी केले.


सदर कार्यक्रमाला पक्षाचे प्रवक्ते अजय महाराज बारस्कर, पुणे शहर अध्यक्ष सुनील गोरे, पिंपरी चिंचवड अध्यक्ष प्रा.नंदकिशोर जगदाळे, नगर जिल्हाध्यक्ष विनोद सिंह परदेशी, शेतकरी संघटना पदाधिकारी संतोष पवार, मंगेश फडके, हवेली तालुकाध्यक्ष महेश कनकोरे, दौंड तालुकाध्यक्ष रमेश शितोळे, तुकाराम रणदिवे, बाळासाहेब मराठे, अजिंक्य बारणे, प्रवीण खरात, रामभाऊ कुकडे, संदीप नवले, प्रज्वल जवळकर, नितेश गाडगे, चंद्रकांत उद्गिरे आदींची उपस्थिती होती.