कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी विषेश मोहीम राबवली जाणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी तसंच राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचून आरोग्य शिक्षण देण्यासाठी राज्यातल्या स्वयंसेवी संस्था तसंच लोकप्रतिनिधींच्या साहाय्यानं ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली जाणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानी आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते.