मागणीतील घसरणीमुळे कच्च्या तेलाचा नकारात्मक व्यापार


मुंबई : जागतिक साथीच्या आजारामुळे कच्च्या तेलाच्या मागणी घट झाल्याच्या चिंतेने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.१९% नी घटले. तथापि, मेक्सिकोतील आखातांमध्ये वादळाच्या आपत्तीने चिंता व्यक्त केली जात होती. मात्र लिबियातील तेल उत्पादनात वाढ झाल्याने हा विषय बाजूला राहिला.


लॉकडाऊनच्या महिन्यानंतर लिबियाने तेल उत्पादन वाढले. जागतिक क्रूड बाजारात लिबिया जवळपास एक दशलक्ष बॅरल द रोज एवढा पुरवठा करेल. तथापि, क्रूडमधील घटत्या मागणीचे सावट अजूनही कायम असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा  चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.


ओपेक सदस्यांची १७ सप्टेंबर २०२० रोजी बैठक होणार असून या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये जागतिक तेलाच्या मागणीत ९.४६ बॅरल प्रतिदिन एवढी घट झाल्याचे नोंदवण्यात आले. अंदाजापेक्षा ही अनेक पटींनी मोठी घट आहे. क्रूडच्या जागतिक मागणीतील घट आणि वाढलेला तेल पुरवठा यामुळे क्रूडच्या किंमती आणखी घसरण घेऊ शकतात. आजच्या सत्रात एमसीएक्सवर तेलाच्या किंमती आणखी घटण्याचा अंदाज आहे.


अमेरिकी डॉलरचे अवमूल्यन आणि अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या डॉव्हिश स्टान्सकडील अपेक्षांमुळे सोमवारी स्पॉट गोल्डचे दर ०.७७% नी वाढून १९५६ डॉलर प्रति औसांवर बंद झाले. अमेरिकी काँग्रेस आणि व्हाइट हाऊसमधील वाटाघाटींमुळे अतिरिक्त प्रोत्साहनपर निधी रोखला जाऊ शकतो, त्यामुळे गुंतवणूकदार पिवळ्या धातूकडे वळत आहेत. ब्रेक्झिट करारासंबंधी वाढत्या चिंतांमुळेही पिवळ्या धातूला आधार मिळाला.


जगभरात कोव्हिड-१९च्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आणि गुंतवणुकादारांमध्ये जागतिक आर्थिक सुधारणेच्या आशा मावळू लागल्याने सोन्याच्या किंमतींना आणखी आधार मिळाला. आजच्या सत्रात सोन्याच्या किंमती दराने व्यापार करतील, अशी अपेक्षा आहे.