अंदमान निकोबार द्वीपसमूहातील पर्यटन व्यवसायाला पुन्हा सुरुवात


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पर्यटन दिन आज साजरा केला जात आहे. "पर्यटन आणि ग्रामीण विकास" असा  यावर्षीचा या दिनानिमित्तचा विषय आहे. मोठ्या शहरांच्या बाहेरील संधी उपलब्ध करुन देण्यात आणि जगभरातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा सामील करण्यात पर्यटनाची वेगळी भूमिका असल्याने दरवर्षी 27 सप्टेंबर रोजी हा दिवस साजरा केला जातो.


संपूर्ण जगात उद्भवलेल्या कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक मूल्याद्वारे शाश्वत विकासाच्या उद्दीष्टांमध्ये कसे योगदान देता येईल, यासह पर्यटन क्षेत्राच्या भविष्यावर पुनर्विचार करण्याची संधी यानिमित्त मिळाल्याचं संयुक्त राष्ट्रांनं म्हटलं आहे.


केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्वीटरवरून शुभेच्छा दिल्या असून भारत पर्यटन क्षेत्रात जगाचं आकर्षण बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.