सहकार व पणन विभागाचा कार्यभार पूर्ववत बाळासाहेब पाटील यांच्याकडे


मुंबई : सहकार व पणन मंत्री श्यामराव ऊर्फ बाळासाहेब पांडुरंग पाटील, यांच्या वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थितीच्या कालावधीत तात्पुरती व्यवस्था म्हणून सहकार व पणन विभागाचा अतिरिक्त कार्यभार दिनांक 19 ऑगस्ट 2020 रोजी जलसंपदा व लाभक्षेत्र  विकास मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला होता.


सहकार व पणन या खात्यांचा अतिरिक्त कार्यभार दिनांक 3 सप्टेंबर,2020 संपुष्टात आला आहे. सहकार व पणन विभागाचा कार्यभार आता पूर्ववत बाळासाहेब पाटील यांच्याकडे आहे.


सदर शासन निर्णय आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.