अमेरिकेनंही टिकटॉक, वुई चॅट या चीनी ऍप्सवर लागु केली बंदी


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेनंही राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत टिकटॉक आणि वुई चॅट या चीनी अँकप्सवर बंदी घातली आहे. अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण आणि अर्थव्यवस्थेला धोका पोहोचवण्यासाठी या अँहप्सचा उपयोग करण्याचा चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचा हेतू आणि मार्ग स्पष्ट दिसून येत असल्याचं अमेरिकेचे वाणिज्य सचिव विल्बर रॉस यांनी म्हटलं आहे.

वुई चॅट अँमपवरची बंदी उद्या रात्रीपासून अंमलात येणार आहे. टिकटॉक नव्यानं डाउनलोड करता येणार नाही मात्र सध्या टिकटॉकचा वापर करणाऱ्यांना 12 नोव्हेंबरपूर्वी ते काढून टाकावे लागणार आहे.