मातोश्री निवासस्थानी निनावी फोन


मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वैयक्तिक निवासस्थान असलेल्या मातोश्री निवासस्थानी दाऊद गँगचा हस्तक असल्याचे सांगत आज आलेल्या निनावी फोन बाबत परीवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, त्या व्यक्तिला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे होते.

मात्र, मातोश्री उडवण्याबाबत धमकी दिलेली नाही, या कॉल बाबत पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलीस याचा सखोल तपास करत आहेत, गंमत म्हणून देखील जर कोणी हा फोन केला असेल तरी त्याच्यावर पोलीसांकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.