अनिश्चित आर्थिक दृष्टीकोनामुळे तेलाच्या किंमतींवर दबाव


मुंबई : तणावाखाली असलेल्या तेलाच्या किंमतीत सुधारणा होण्याची गती अत्यंत कमी असल्याने डब्ल्यूटीआय क्रूडचे दर बुधवारी ३ टक्क्यांनी घसरले व ते ४१.५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. महामारीचा व्यापक परिणाम झाल्याने जागतिक तेल बाजार सुधारणेसाठी संघर्ष करत आहे. त्यामुळे कच्च्या तेलाबाबतच्या दृष्टीकोनावर परिणाम झाला. उदास दृष्टीकोनामुळे तेलाच्या किंमतीवर दबाव आला असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. अमेरिकेतील तेल साठ्यात मागील आठवड्यात मोठी घट दिसून आल्यानंतरही तेलाच्या किंमती घसरल्या. अमेरिकी तेलसाठ्यात दररोज ९.४ दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त घट झाली. अमेरिका-चीन संबंध ऑगस्ट २०२० मध्ये सुधारल्याने तेलाच्या किंमतीतील नुकसान कमी झाले.


सोने: बुधवारी, अमेरिकी डॉलरच्या मूल्यात सुधारणा झाल्याने आर्थिक सुधारणांविषयीचा आशावाद वाढला. यामुळे पिवळ्या धातूच्या किंमतीवर परिणाम झाला. स्पॉट गोल्डच्या किंमती १.४० टक्क्यांनी कमी होऊन १९४२.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. दोन वर्षांतील निचांकी पातळी गाठल्यानंतर अमेरिकी डॉलरने सुधारणा केली. त्यामुळे सोन्याचे दर घसरले. अमेरिकेत तयार झालेल्या मालाची मागणी वाढणे आणि अमेरिकेतील कारखान्यातील कामकाजातील वृद्धी यामुळे आर्थिक सुधारणांच्या शक्यता दाट झाली आहे. इन्स्टिट्यूट फॉर सप्लाय मॅनेजमेंट (आयएमएम) च्या अहवालानुसार, अमेरिकेतील कारखान्यातील आकडेवारी ऑगस्ट २०२० मध्ये ५६ वर पोहोचली. जुलै २०२० मध्ये ती ५४.२ एवढी होती. अमेरिकेतील बेरोजगारी दाव्यांवर तसेच एकूणच आर्थिक स्थिती लक्षात घेण्यासाठी नॉन-फार्म पेरोल डाटावर बाजाराला बारकाईने नजर ठेवाली लागेल. एमसीएक्सवर सोन्याचे दर १.३९ टक्क्यांनी घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात ते ५०८२१ रुपये प्रति तोळा एवढे झाले.


बेस मेटल्स: लंडन मेटल एक्सचेंज (एलएमई) वरील बेस मेटलचे दर, अमेरिकी डॉलरमधील सुधारणेमुळे घसरले. तसेच अमेरिकी कामगार बाजार कमकुवत दिसल्यानेही तेलाच्या किंमतीवर ताण आला. सलग दुस-या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट २०२० मध्ये जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेतील पगाराच्या नकारात्मक आकडेवारीनने कमकुवत कामगार बाजाराचे संकेत दिले. त्यामुळे औद्योगिक धातूच्या किंमती घटल्या. फेब्रुवारी २०२० मध्ये मोठी घसरण अनुभवल्यानंतर चीनच्या कारखान्यातील कामकाजात सातत्याने वाढ दिसून येत आहे. एका खासगी सर्व्हेनुसार, मागील महिन्यात चीनच्या उत्पादन क्षेत्रातील वाढ ही मागील दशकातील सर्वात जास्त गतीने झाली. २०२० या वर्षातील सुरुवातीच्या महिन्यात घट दिसली तरीही चीनमधील पायाभूत सुविधाकेंद्रीत प्रोत्साहनपर पॅकेजेस आणि उत्पादनातील सुधारणेचे संकेत तसेच सेवा क्षेत्रातील वाढ यामुळे औद्योगिक धातूंच्या किंमती वाढल्या.


तांबे: अमेरिकी डॉलरने मागील सत्रातील तोटा भरून काढल्याने बुधवारी, एलएमई तांब्याचे दर ०.१४ टक्क्यांनी वाढून ६६९७ डॉलर प्रति किलो एवढे झाले. तथापि, एलएमई तांब्याच्या साठ्यात घट आणि चीनमधील मजबूत आकडेवारीमुळे तेलाच्या किंमतींना काहीसा आधार मिळाला.


Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गांकरिता आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image