मुंबईत गेल्या चोवीस तासात सुमारे 2 हजार 321 नवीन रुग्णांची नोंद


मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत आतापर्यंत 1 लाख  30 हजार 16 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले  आहेत. गेल्या चोवीस तासात सुमारे 2 हजार 321 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या 1 लाख 67 हजार 608 वर गेली आहे.

काल 42, तर आतापर्यंत मृतांचा आकडा 8 हाजर 106 वर पोहचला आहे.  मुंबईत दरदिवशी सुमारे 15 हजार चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत 9 लाख 3 हजार 101 चाचण्या करण्यात आल्या आहेत.