येस बँक गैरव्यवहार प्रकरणी 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येस बँक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं 127 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीनं या प्रकरणातील आरोपी राणा कपूर यांच्या मालकीचा लंडनमधील फ्लॅट ताब्यात घेतला आहे. या निवासी फ्लॅटची किंमत 127 कोटी रुपये आहे.

कपूर यांनी 2017 मध्ये डूइट क्रिएशन्स जर्सी लिमिटेडच्या नावानं या फ्लॅटची खरेदी केली असून तेच त्याचे मालक आहेत. येस बँक गैरव्यवहार प्रकरणात ईडीनं काळा पैसा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आतापर्यंत एकंदर 2 हजार 11 कोटी रुपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे.