बिहारमधील कोसी रेल महासेतूसह 12 प्रवासी रेल्वे प्रकल्प तसंच विद्युत परियोजनांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बिहारमधल्या ऐतिहासिक कोसी महासेतूच लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे केले. त्यांनी बिहारमधल्या इतर १२ रेल्वे प्रकल्पांचही उद्घाटन केल. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते.

या प्रकल्पांचा फायदा बिहारमधल्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे. 1.9 दशांश किलोमिीटर लांबीचा हा कोसी रेल्वे पुल 516 कोटी रुपये खर्चुन बांधण्यात आला आहे. यामुळे बिहारच्या निर्माळी ते सारायगड मधील सध्याचा 298 किलोमिटर अंतराचा रेल्वे प्रवास 22 किलोमिटरवर आला आहे.